Breaking News

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना अटक

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि. ४ नोव्हेंबर) - अलिबाग येथील एका इंटीरिअर डिझायनरच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आत्महत्या प्रकरणात मुंबई येथे पोलीस चौकशीसाठी आज अर्णब यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णब यांनी पोलिसांना सहकार्य न करता दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

        2018 मध्ये अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आले होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.

No comments