सातारा जिल्ह्यात 145 कोरोना बाधित ; 11 बाधितांचा मृत्यु
सातारा दि. 7 - जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 145 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 10, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, माची पेठ 1, कोडोली 2, तामजाईनगर 1, शाहुनगर 2, करंजे 1, कळंबे 1, नागठाणे 1, मांढवे 2, रोहट 1, सोनगाव 1, अंबवडे 2, खावली 1, रोहट 1, वाढे 2, वर्णे 1, आरफळ 1.
कराड तालुक्यातील कराड 2, खोडशी 1, आने 1, काले 3, कापिल 1, बनवडी 1.
पाटण तालुक्यातील काराळे 1, करपेवाडी 2.
फलटण तालुक्यातील फलटण 3, गजानन चौक 2, कोळकी 2, होळ 1, साखरवाडी 3, सुरवडी 1, वडजल 1, राजुरी 2, निरगुडी 1, हिंगणगाव 1, कांबळेश्वर 1, कापशी 1, तरडगाव 2, सालपे 3.
खटाव तालुक्यातील औंध 1, वडूज 4, पुसेगाव 4, फडतरवाडी 1, पेडगाव 8, साठेवाडी 2, उंबरडे 1.
माण तालुक्यातील जाधववाडी 1, मार्डी 4, म्हसवड 3, मलवडी 2, राणंद 4, बिदाल 1.
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, खेड 4, ल्हासुर्णे 1, सातारारोड 1, एकसळ 1, नांदगिरी 1, बिचुकले 5, पिंपोडे बु 1.
जावली तालुक्यातील भोगावली 1, मेढा 1, सायगाव 2, दुंड 2.
वाई तालुक्यातील निकमवाडी 1, पांडे 2, परखंडी 1.
पाटण तालुक्यातील पाटण 1, केर 1.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1.
इतर 2, मुळीकवाडी 1, नेहरवाडी 1.
बाहेरील जिल्ह्यातील विटा खानापूर 1.
11 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये सुलतानपूर ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, आदित्यनगरी ता. सातारा येथील 62 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटल मध्ये साखरवाडी ता. फलटण येथील 78 वर्षीय् पुरुष, पाटण येथील 76 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले खेड ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, साठेवाडी ता. कोरेगाव येथील 74 वर्षीय पुरुष, करंजे पठ, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 62 वर्षीय पुरुष, जकात नाका करंजे सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -205509
एकूण बाधित -47754
घरी सोडण्यात आलेले -43488
मृत्यू -1603
उपचारार्थ रुग्ण-2663
No comments