Breaking News

सातारा जिल्ह्यात 157 कोरोना बाधित ; 5 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  5 died and 157 corona positive

    सातारा दि. 3 -: जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 157 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

      सातारा तालुक्यातील सातारा 2, व्यंकटपुरा पेठ 3,  सदरबझार 2, शाहुपरी 1, शाहुनगर 1, वेचले 1, जवाळवडी 1, लिंबाचीवाडी 2, क्षेत्र माहुली 1, सैदापूर 1, गुलमोहर कॉलनी सातारा 1, सर्कल 1, गोळीबार मैदान सातारा 1, सोनवडी 1, यादोगोपाळ पेठ 1,
कराड तालुक्यातील वारुंजी 1, ओगलेवाडी 1, तांबवे 2, रेठरे 1, निमसोड 1, मलकापूर 1, मुंढे 1, मसूर 1,
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1, पाटण 3, रामपुर 1, करपेवाडी 3, नाटोशी 1,
फलटण तालुक्यातील फलटण 2,  कोळकी 1, घाडगेवाडी 1, मटाचीवाडी 1, मुळीकवाडी 1, आसु 1, विढणी 2, गुणवरे 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेवर 1,
खटाव तालुक्यातील खटाव 2, पुसेवडेवाडी 1, विसापूर 1, सिद्धश्वर कुरोली 28, वडूज 6, मायणी 5, ढोकळवाडी 1, काटेवाडी 2, नागनाथवाडी 1,
 माण  तालुक्यातील पिंगळी बु 1, राणंद 1, दिवडी 2, दहिवडी 2, आंधळी 5, टाकेवाडी 1, पळशी 2, म्हसवड 1, बीदाल 1, मोही 4, सोकासन 1, शिंगणापुर 1, खुतबाव 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3, अनपटवाडी 1, रहिमतपूर 1, बीचुकले 1,
जावली तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ 3, ओझरे 2, मेढा 2, कुसुंबी 1, बेलोशी 1, आगलावेवाडी 1, सरताळे 3, काटावळी 3,
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 1,  पळशी 1, मिरजे 1,
इतर वाजलवाडी 1, नेवेकरवाडी 2, सांगवी 1, नडवळ 1,
बाहेरी जिल्ह्यातील कडेगाव 1, नरसिंगपूर 1, दौंड 1, ठाणे 1,

5 बाधितांचा मृत्यु
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये कोपर्डे ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव येथील 55 वर्षीय पुरुष, राणंद ता. माण येथील 66 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळविलेले भुसे ता. कोरेगाव येथील 77 वर्षीय पुरुष, खिंडवाडी ता. सातारा येथील 83 वर्षीय पुरुष  अशा एकूण 5 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने -194464
एकूण बाधित -46932  
घरी सोडण्यात आलेले -42134  
मृत्यू -1568
उपचारार्थ रुग्ण-3230

No comments