Breaking News

थोडासा दिलासा ! फलटण तालुक्यात 3; सातारा जिल्ह्यात 33 कोरोना पॉझिटिव्ह तर 7 मृत्यू

Corona virus Satara District updates :  7 died and 33 corona positive

        फलटण दि. 8 नोव्हेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 8 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत आणि पद्मावती नगर ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तर सातारा जिल्ह्यात (फलटणसह) एकूण 33  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात आज प्रथमच कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याची संख्या ही 3 अंकावरून 2 अंकावर घसरली असल्यामुळे नागरिकांना समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात आज 7 व्यक्ती मृत पावल्या आहेत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

जिल्ह्यातील 33 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 7 बाधितांचा मृत्यु
 
        जिल्ह्यात  जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 33 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 7 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये

 सातारा तालुक्यातील सातारा 1, गुरुवार पेठ 1, तामजाई नगर 1, चिंचणेर 1, विलासपूर 1,
 कराड तालुक्यातील  विंग 1, इंदोली 1,
फलटण तालुक्यातील भडकमकरनगर 1, वडजल 1, चौधरवाडी 1,
माण  तालुक्यातील दहिवडी 1, गोंदवले 4, माहिमगड 1, बिदाल 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, तांदुळवाडी 1, गाळेवाडी 1, एकसळ 1,
जावली तालुक्यातील डांगेघर 2, हातगेघर 2, कुडाळ 2
वाई तालुक्यातील पांडे 2, धोम कॉलनी 2
बाहेरी जिल्ह्यातील साखराळे वाळवा, जि. सांगली 1, शाहुवाडी जि. कोल्हापूर 1.

7 बाधितांचा मृत्यु
  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  जांभे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठ, सातारा येथील 79 वर्षीय पुरुष तसेच उशीरा कळविलेले पद्मावती नगर ता. फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, शिंदी ता. माण येथील 66 वर्षीय पुरुष, बाराटेवाडी ता. माण येथील 80 वर्षीय पुरुष, दहिगाव ता. माळशिरस सोलापूर येथील 68 वर्षीय महिला असे एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारादतम्यान मृत्यू झाला असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने -205774
एकूण बाधित -47787  
घरी सोडण्यात आलेले -43638  
मृत्यू -1610
उपचारार्थ रुग्ण-2539 

No comments