Breaking News

पदवीधर मतदार संघातून उमेदवारी; पक्ष जो निर्णय घेईल तोच आमच्यासाठी अंतिम - श्रीमंत संजीवराजे

        फलटण, दि. 8 (गंधवार्ता वृत्तसेवा) -: पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाकडून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी गेल्या काही दिवसापासून सातारा जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना छेडले असता, माजी केंद्रीय मंत्री व खासदार शरदचंद्रजी पवार व पक्ष जो निणर्य घेतील तो आम्हाला मान्य असेल. मतदार संघामध्ये ज्या भागामध्ये पदवीधर मतदार जास्त असतील, त्या सर्वाचा विचार आदरणीय पवार साहेब करतील, आणि त्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णया  बरोबर आम्ही सर्वजण निश्चित पणे राहणार आहोत.    या पूर्वीही पवार साहेब व पक्ष श्रेष्ठींनी दिलेल्या निर्णयाचे पालन आम्ही सर्वानी केलेले आहे. व या पुढेही पक्ष जो निर्णय घेईल तोच आमच्यासाठी अंतिम असेल असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.


No comments