Breaking News

मुख्याधिकारी यांच्या आश्‍वासनानंतर सर्वपक्षीय धरणे आंदोलन स्थगित

मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याशी चर्चा करताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
        फलटण दी. 9 नोव्हेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहरातील रस्ते खराब झालेले आहेत,  त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर नगर परिषदेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर परिषदेला देण्यात आला होता,  परंतु अद्याप रस्ते दुरुस्त न झाल्यामुळे आज दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी नगर परिषदेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान आंदोलन स्थळावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याशी संबंधित गटर योजने बाबत चर्चा केली. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी, पॅचवर्क करण्याबाबत मी प्रस्ताव तयार करून, मिटिंग मध्ये ठेवतो, व लवकरात लवकर पॅचवर्क मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन दिल्यानंतर धरणे आंदोलन  स्थगित करण्यात आले.
        सर्व पक्षीय धरणे आंदोलनात विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, सचिन सुभाषराव सूर्यवंशी, सचिन अहिवळे, श्रीमती मंगलादेवी नाईक-निंबाळकर ,सौ. मदलसा कुंभार, सौ मीना नेवसे,  सौ ज्योती खरात, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते महेंद्र सूर्यवंशी, भाजपा संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर, सौ मुक्ती राहुल शहा, डॉ. प्रविण आगवणे, अभिजीत नाईक निंबाळकर, डॉ. सुभाष गुळवे, राजेश शिंदे, अमीर शेख, नानासाहेब इवरे, संजय गायकवड, आप्पा सरगर, मनोज कांबळे, अरुण खरात सर, नितीन जगताप, आनंद वनवे, नितीन वाघ, राजकुमार देशमाने, वसीम मनेर, पंकज पवार, शरद सोनवणे, कृष्णात नेवसे, किसन भोईटे, किरण राऊत, विठ्ठल आंबोले, शशिकांत रणवरे, गणेश गायकवाड, सचिन पवार, राजेंद्र  नागटिळे, मानाजी चव्हाण, मंगेश आगवणे, रिपाईचे लक्ष्मण अहिवळे, तेजस काकडे, विक्रांत काकडे, अभिलाष मोरे, सागर गायकवाड, सादिक कुरेशी, आनंद काकडे, रणजीत माने, सुनील जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासन,  सत्ताधारी व कॉन्ट्रॅक्टर यांनी मिळून हा घाट घातलेला आहे - समशेरसिंह नाईक निंबाळकर

        फलटणमध्ये सुरू असणारी भुयारी गटार  योजनेमुळे फलटणचे सर्व रस्ते खराब झालेले आहेत, विरोधीनपक्षाने  नगरपालिकेकडे रस्ते दुरुस्तीची मागणी केली परंतु नगरपालिका  निधी नसल्याचे कारण पुढे करत आहे, परंतु विरोधी पक्षाने पूर्वीच  नगर पालिका प्रशासन प्रशासन व सत्ताधाऱ्यांना सांगितले होते की तुम्ही रस्त्याची कामे आत्ता करू नका,  भुयारी गटार योजना  पूर्ण झाल्यानंतर सर्व रस्त्यांची कामे काढा, परंतु त्यावेळी  सत्ताधारी यांनी  कॉन्ट्रॅक्टरला फायदा पोहोचवण्यासाठी  निकृष्ट दर्जाची कामे करून घेतली व परत  भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खुदाई सुरू केली आहे. नगरपालिका प्रशासन,  सत्ताधारी व संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी मिळून हा घाट घातलेला आहे, यांनी संगनमताने कित्येक कोटीचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी केला.

डांबरी पॅचवर्क झालेच पाहिजे त्याशिवाय आंदोलन थांबणार नाही-  अशोक जाधव 

        फलटण नगरपरिषदेने भुयारी गटार नावाखाली मलनिस्सारण योजनेची कामे सुरू केली आहेत,  मागील वर्ष ते दीड वर्ष झाले रस्ते खोदून ठेवले आहेत. जो रस्ता उकरला आहे, तो रस्ता संबंधित ठेकेदार दुरुस्त करत नाही. मागील दीड वर्षापासून  नगरपालिकेकडे दुरुस्तीसाठी अर्ज केले. या रस्त्यामुळे कित्येक अपघात झाले आहेत, पण अद्याप नगरपालिकेने रस्ते व खड्डे बुजवले नाहीत. फलटणमध्ये सर्व रस्ते धुळीचे झाले आहेत, त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत, पण याची कोणतीही दखल नगरपालिका, सत्ताधारी व संबंधित ठेकेदार घेत नाही, जे रस्ते उकरले आहेत, ते डांबरी पॅचवर्क झाले पाहिजे त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचे नगरसेवक व गटनेते अशोक जाधव यांनी यावेळी सांगितले.

सत्ताधाऱ्यांनी फक्त पैसे खाणे व टेंडरमध्ये हिस्सेदारी करणे एवढेच काम केले -  अनुप शहा

         गटार योजनेचे काम मुळात 72 कोटीच्या होते पण या कामात 32% निधी वाढवला गेला,  भुयारी गटार योजना सुरू करताना, रस्ते खोदावे लागणार आहेत व त्यानंतर पॅच वर्क करावे लागणार असल्यामुळे पैसे जास्त जाणार असल्याचे सत्ताधार्‍यांनी टेंडर  निधी वाढवताना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी रस्ते खोदले, त्यावर दोन वर्षे झाली तरी, त्याचे पॅचवर्क करण्यात आलेले नाही, हा सर्व पैसा कोणी लाटला? तो कोणाकडे गेला? याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक अनुप शहा यांनी केली, तसेच  सत्ताधाऱ्यांनी फक्त पैसे खाणे व टेंडरमध्ये हिस्सेदारी करणे एवढेच काम केले असल्याचा आरोपही नगरसेवक अनुप शहा यांनी यावेळी केला.

डांबरी पॅचवर्क करीता प्रस्ताव सादर करण्यात येईल - मुख्याधिकारी

        फलटण नगर परिषदेमार्फत सध्या शहरातील विविध भागामध्ये भुयारी गटर योजनेचे काम सुरू असून ते प्रगतीपथावर आहे. सदरचे काम में. लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरींग प्रा.लि. कोल्हापूर या कंपनी मार्फत सुरू आहे. सद्यस्थितीत विविध भागातील कामे झालेले रस्ते सुस्थितीत करणेचे काम सुरू आहे. सदर काम झालेल्या रस्त्यांचे पुनःसर्वेक्षण करुन डांबरी पॅचवर्क करीता मंजूरी साठी मा.नगराध्यक्षा यांचे कडे पढील कार्यवाहीस सादर करणेत येईल. सदरचे रस्ते सुस्थितीत करुन पुढील लाईनआऊटचे देणेत येतील. सदरचे सुचना पत्र ठेकेदार यांना देणेत आलेले आहे.

        फलटण नगरपरिषद हद्दीतील सुमारे र.रु. १४.४० कोटो पर्यंत रस्त्यास महाराष्ट्र शासन यांचे कडुन अनुदान प्राप्त झाले आहे. या बाबतची कार्यन्वपिन यंत्रना सार्वजनिक बांधकाम विभाग आहे. सदर कामांच्या ई निविदा काढणेची कार्यवाही संबंधीत कार्यन्वयिन यंत्रने मार्फत चालू आहे. सदर कार्यवाही पूर्ण होताच शहरामधील बहुतांशी रस्ते पूर्ववत होणार आहे. तसेच ज्या भागामध्ये भुयारी गटरचे काम झालेले आहे त्या ठिकाणी आपणांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक रस्ते दुरुस्तीची कामे करून घेता येईल असे पत्र मुख्याधिकारी, फलटण नगर परिषदेच्या वतीने आंदोलनकर्त्यांना देण्यात आले.

No comments