Breaking News

के बी एक्सपोर्ट कडून फडतरवाडी गावात स्टीम वेपोरायझर मशीन वाटप

        फलटण दि. 1 नोव्हेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या  पार्श्वभूमीवर फडतरवाडी येथे गावातील गरजू नागरिक व आशा सेविका यांना 100 स्टिम वेपोरायझर  मशीनचे वितरण के.बी एक्सपोर्ट कंपनीच्या वतीने करण्यात आले. 

        सामाजिक बांधिलकी जपण्याची कंपनीची परंपरा जपत फडतरवाडी गावाच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यांमध्ये सहभागी होत, के बी एक्सपोर्ट कंपनीकडून या मशीनचे वितरण करण्यात आले. यापुर्वीही कंपनीच्या माध्यमातून लॉकडाउनच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले होते अशी माहिती फडतरवाडी गावचे पोलीस पाटील शांताराम काळेल पाटील यांनी दिली.

        फडतरवाडी ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी बहुमूल्य अशी मदत केल्याबद्दल के. बी. एक्सपोर्ट कंपनीचे डायरेक्टर श्री. सचिन यादव साहेब व कंपनीचे जनसंपर्क अधिकारी श्री. संदीप शिंदे यांचे आभार फडतरवाडी गावातील ग्रामस्थ  धनंजय भोसले, मंगेश नाळे, योगेश फडतरे,विजय फडतरे यांनी मानले.

No comments