Breaking News

एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला, बानगुडे पाटील, रजनी पाटील यांचा यादीत समावेश

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 7 नोव्हेंबर) - महाविकास  आघाडी सरकारच्यावतीने  12 आमदारांची यादी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली. यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे, यशपाल भिंगे यांचा समावेश आहे.  शिवसेनेतर्फे उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर यांचा समावेश आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस कडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर यांचा समावेश आहे. 

        काल संध्याकाळी ६ च्या सुमारास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री अनिल परब आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी या तिन्ही मंत्र्यांनी आपआपल्या कोट्यातील राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांना दिली आहे.

         कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करून 12 नावांची यादी मुख्यमंत्र्याच्या शिफारस पत्रासह राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली आहे. आणि आम्हाला आशा आहे की लवकरच राज्यपाल यावर निर्णय घेतील असे मंत्री नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 नावांच्या शिफारशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे केलेली आहे.

शिवसेना
उर्मिला मातोंडकर
चंद्रकांत रघुवंशी
विजय करंजकर
नितीन बानगुडे पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ खडसे
राजू शेट्टी
यशपाल भिंगे
आनंद शिंदे

राष्ट्रीय काँग्रेस
रजनी पाटील
सचिन सावंत
मुझफ्फर हुसेन
अनिरुद्ध वनकर

No comments