नवीन महाविद्यालयास परवानगी देण्याची मुदत वाढविली
Cabinet decision - Extended the deadline for permitting a new college
मंत्रिमंडळ निर्णय : दि. ५ नोव्हेंबर २०२० - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता नवीन महाविद्यालय, नवीन पाठ्यक्रम, विषय, तुकडी सुरु करण्यासाठी असलेली मुदत सुमारे दोन महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
याअनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमात आवश्यक तो बदल करण्यात येईल.
‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण
मंत्रिमंडळ निर्णय : दि. ५ नोव्हेंबर २०२० - ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचे दोन्ही टप्पे पूर्ण झाले असून 12 कोटी लोकसंख्येचे आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला मदत होईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. या मोहिमेमुळे 50 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले. गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्या झपाट्याने कमी होत असून ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत तब्बल 63 टक्के घट झाली आहे . मोहिमेमुळे 3 लाख 57 हजार आयएलआय आणि सारीचे रुग्ण देखील आढळले.
सध्या राज्यात 1 लाख 16 हजार 284 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत मात्र युरोपमध्ये ज्या प्रकारे दुसरी लाट येते आहे ते पाहून आपण अधिक काळजी घेतल्यास व नियम पाळल्यास कोरोनाची लाट रोखू शकू असेही मुख्यमंत्री म्हणाले
No comments