Breaking News

ऑक्टोबर मध्ये 1 लाख कोटींच्या पुढे जीएसटी जमा

GST collection beyond Rs 1 lakh crore in October

        मुंबई  - ऑक्टोबर  2020 मध्ये  1,05,155 कोटी रुपये सकल  जीएसटी (वस्‍तु आणि सेवा कर) महसूल संकलन झाले ज्यात सीजीएसटी 19,193 कोटी रुपये, एसजीएसटी 25,411 कोटी  रुपये, आयजीएसटी 52,540 कोटी रुपये  (मालाच्या आयातीवर संकलित  23,375 कोटी रुपयांसह ) आणि उपकर (सेस) 8,011 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित  932 कोटी रुपयांसह ) समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यासाठी 31 ऑक्टोबर , 2020 पर्यंत दाखल करण्यात आलेल्या  जीएसटीआर-3बी विवरणपत्रांची एकूण  संख्‍या 80 लाख आहे.

        सरकारने नियमित निपटारा स्वरूपात  आयजीएसटीमधून  सीजीएसटीसाठी  25,091 कोटी  रुपये आणि एसजीएसटीसाठी 19,427 कोटी  रुपये दिले आहेत. ऑक्टोबर  2020 मध्ये नियमित निपटारा केल्यानंतर  केन्‍द्र सरकार आणि राज्‍य सरकारे यांनी मिळवलेला एकूण महसूल सीजीएसटीसाठी 44,285 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी  44,839 कोटी  रुपये आहे..

        या महिन्यात मिळालेला जीएसटी महसूल गेल्या वर्षी याच कालावधीत मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत  10 टक्के  अधिक आहे. या महिन्यात मालाच्या आयातीतून मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 टक्के  अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारांमधून  (सेवांच्या आयातीसह ) प्राप्त महसूल  11 टक्के  अधिक होता. जीएसटी महसुलातील वाढ जुलै , ऑगस्ट आणि सप्टेंबर  2020 च्या तुलनेत अनुक्रमे  (-)14, -8 आणि  5 टक्के  वाढ नोंदली गेली जी अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि महसुलातील वाढ दर्शवते.

        खाली दिलेला तक्ता चालू वित्त वर्षादरम्यान  मासिक सकल जीएसटी महसुलातील कल दर्शवतो. त्यामध्ये ऑक्टोबर  2019 च्या तुलनेत ऑक्टोबर  2020 दरम्यान आणि संपूर्ण वर्षात  जीएसटी संकलन  दिले आहे-


No comments