कार चालकाने बॉनेटवर लटकवून फरफटत नेलेल्या जिगरबाज आबा सावंत यांच्या पाठीवर गृहमंत्र्यांची शाबासकीची थाप
वाहतुक पोलिस अंमलदार श्री आबासाहेब सावंत यांचा गृहमंत्री मा.श्री.अनिल देशमुख यांनी मुंबई येथे सत्कार केला |
मुंबई :- जीवाची बाजी लावून कर्तव्य निभावणाऱ्या आबा सावंतसारख्या वाहतूक पोलिसांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे काढले.
पिंपरी चिंचवड येथे मास्क न घातल्याने एका कार चालकाविरुद्ध वाहतूक पोलिस कारवाई करत असताना, त्या वाहन चालकाने वाहतूक पोलीस आबा सावंत यांना, त्या कार चालकाने बॉनेटवर लटकवून फरफटत नेले. तरीही मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. त्यांचा सत्कार शाल व पुष्पगुच्छ देऊन गृहमंत्री महोदयांच्या ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, तसेच सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले उपस्थित होते.
श्री. देशमुख यांनी आबा सावंत यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. या घटनेबद्दल सविस्तर माहिती विचारली, आणि त्यांचे कौतुक केले. आबा सावंत हे लातूर जिल्ह्यातील किल्लारीचे रहिवासी आहेत.आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आबा सावंत यांना 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिल्याचेही गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी, चिंचवड वाहतुक विभागांतर्ग येणा-या अहिंसा चौक येथे विनामास्क वाहनचालकांवर पोलीस कर्मचारी पोना ८२१ आबासाहेब विजयकुमार सावंत हे कारवाई करीत असताना एम एच ०१ वाय ८८३७ या क्रमांकाची फियाट उनो वाहन चालक नामे युवराज हनुवते हे चालवत होते. तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. सदर वाहन चालकास सावंत यांनी थांबवण्यासाठी इशारा केला परंतु त्यांनी त्यांचेकडे जाणीवपूर्क दुर्लक्ष करुन वाहन बाजुला न करता तसेच पुढे दामटले. त्यामुळे समोर उभे असलेले पोना सावंत यांचा गुडघ्याला इजा झाली व ते बोनेटवर पडले त्यामुळे त्यांचे उजव्या गुड़ग्व्यास गंभीर दुखापत झाली. परंतु चालकाचे त्याकडे दुर्लक्ष करुन सदर फियाट उनो ही एल्प्रो कंपनी ते चाफंकर चौक मार्गे पिएन जी ज्वेलर्स पर्यंत अंदाजे ८०० मिटर पर्यंत पोना सारवंत यांना कारच्या बॉनेटवर बसलेल्या स्थितीतच वाहन पळविले. तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या दोन दुचाकीस्वारांनी पुढे जाणा-या झायलो गाडीस रस्त्याच्या मध्ये थांबवुन सदर वाहनचालकास वाहन थांबविण्यात भाग पाडले. त्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली.
No comments