Breaking News

महिला अत्याचार प्रतिबंधासाठी कडक कायदा करणार – गृहमंत्री अनिल देशमुख

Home Minister Anil Deshmukh said that strict laws will be enacted to prevent atrocities against women.

        नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी यासाठी कडक कायदा करण्यात येईल. तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि त्यासाठी तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

        शहादा तहसिल कार्यालयात कोविड-19 आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

        श्री.देशमुख म्हणाले महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. अशा प्रकरणात गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सारंगखेडा येथील प्रकरणात ॲड.उज्ज्वल निकम यांच्यासारख्या तज्ज्ञ वकीलाचे सहकार्य घेण्यात येईल. त्यासाठी पोलिसांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा.

No comments