Breaking News

हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा आज श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते शुभारंभ

Inauguration of Hotel Ashoka Pure Veg Restaurant by Shrimant Ramraje

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  -  फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारे व महाराष्ट्रीयन, चायनीज, कॉन्टिनेन्टल आणि खवय्यांच्या आवडीचे पदार्थ  उपलब्ध असणाऱ्या, हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा गुरुवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ५:३० वाजता, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ होत आहे. याप्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद साताराचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, के बी एक्सपोर्ट चे डायरेक्टर सचिन यादव यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये, भोईटे बिल्डींग, डेक्कन चौक, फलटण येथे उद्घाटन समारंभ संपन्न होत असल्याचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी सांगितले आहे.
        हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये महाराष्ट्रीयन चायनीज कॉन्टिनेन्टल आणि खवय्यांचे आवडीचे सर्व पदार्थ उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर येथे घरगुती समारंभ, संघटनांच्या बैठका, वाढदिवस, बारसे यासारखे समारंभ १०० आसन व्यवस्थेसह, संपूर्ण वातानुकूलित बँक्वेट हॉल उपलब्ध असणार आहे. फलटण शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू होत असलेल्या हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये ग्राहकांना सस्मित सेवा व दर्जेदार अन्नपदार्थ देण्यावर भर असणार असल्याचे अमित अशोकराव भोईटे यांनी सांगितले आहे.

No comments