Breaking News

श्रीमंत रामराजे यांच्याकडून भुयारी गटार योजना व रस्त्यांची पाहणी ; रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना

कसबा पेठ येथे रस्त्यांची पाहणी करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ. प्रगती कापसे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व इतर 
            फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ७ नोव्हेंबर -  : फलटण शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. भुयारी गटार योजनेच्या कामामुळे फलटण शहरातील नागरिकांना थोडीशी गैरसोय सहन करावी लागत आहे.  त्यात मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भुयारी गटारासाठी खोदलेली माती रस्त्यावर पसरल्याने रस्ते जास्त खराब झाले होते. त्यासाठीच आज श्रीमंत रामराजे यांनी फलटण शहरातील रस्त्यांची स्वतः पाहणी केली आणि रस्ते दुरुस्ती बाबत संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
विद्यानगर येथे रस्त्यांची पाहणी करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रामराजे युवा मंच संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर व इतर
         आज शनिवार दि. ७ नोव्हेंबर रोजी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील बहुतांश ठिकाणचे भुयारी गटार योजनेच्या सद्यस्थितीत या कामाची पाहणी केली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगरसेविका सौ. प्रगती कापसे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत रामराजे युवा मंच संस्थापक अध्यक्ष राहुल निंबाळकर, युवा नेते तेजसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, माजी नगरसेवक किशोर (गुड्डू) पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कसबा पेठ येथे रस्त्यांची पाहणी करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे,  युवा नेते तेजसिंह भोसले, नगरसेविका सौ. प्रगती कापसे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, आसिफ मेटकरी, किशोर (गुड्डू) पवार, सैफ शेख व इतर 
          फलटण शहरामध्ये भुयारी गटार योजना ही महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंजूर करून आणलेली आहे. भुयारी गटार योजना ही पूर्ण होण्यासाठी रस्ते खोदण्याशिवाय पर्याय नाही.  भुयारी गटार योजनेचे प्रत्यक्षात काम सद्यस्थितीला फलटण शहरामध्ये सुरू आहे. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी जो रस्ता खोदून पाईपलाईन टाकून परत बुजवण्यात आला परंतु मध्यंतरी  झालेल्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे फलटणकरांच्या तक्रारी पोहोचल्या. त्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्वतः फलटण शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाची पाहणी केली व संबंधितांना योग्य प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.

        यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले की, भुयारी गटार योजनेचे ज्या रस्त्यावर काम चालू आहे ते रस्ते पूर्ण झाल्यानंतर फलटण शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांच्या साठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भरीव निधी मंजूर करून आणलेला आहे. सदरील काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द करण्यात आलेले आहे. फलटण शहरातील सर्वच रस्ते लवकरात लवकर कसे व्हावे त्यासाठी एका मोठ्या कंत्राटदाराच्या कडून सदरील काम लवकरात लवकर करून घेतले जाणार आहे. 

        सद्यस्थितीमध्ये फलटणमधील नागरिकांना निश्चितच गैरसोय होत आहे. परंतु भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत फलटणकरांना थोडीशी गैरसोय सहन करावी लागणार आहे. भुयारी गटार योजना ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्नातून फलटणसाठी आणलेली आहे व फलटण साठी भुयारी गटार योजना ही अत्यंत महत्त्वाची असून भुयारी गटार योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. याबाबत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संबंधितांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

No comments