अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी
गंधवार्ता वृत्तसेवा - अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून, जो बायडेन व डोनाल्ड ट्रंप यांच्यात चाललेल्या कांटे की टक्कर मध्ये, जो बायडेन हे विजयी झाले आहेत. जो बायडेन हे अमेरिकेचे नवे अध्यक्ष होणार आहेत. डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाल्याचे वृत्त येताच अमेरिकेत जल्लोष सुरू झाला. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस अमेरिेकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत.
२८ वर्षांत प्रथमच यंदा अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षाला दुसऱ्यांदा कार्यकाळ मिळू शकलेला नाही. बायडेनपेक्षा त्यांच्या सहकारी कमला हॅरिस यांनी मोठा विक्रम आपल्या नावे प्रस्थापित केला असून अमेरिकेच्या इतिहासात त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असतील. कमला यांची आई मूळ तामिळनाडूची होती. दरम्यान, बायडेन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष असतील. यापूर्वी २००९ ते २०१७ दरम्यान बराक ओबामा यांच्या काळात ते उपाध्यक्ष होते. तीन दशके त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जीव तोडून प्रयत्न केले होते. तिसऱ्या प्रयत्नात ते राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले.
No comments