आमदारांची यादी राज्यपालांकडे ; राज्यपाल शिक्कामोर्तब करतील अशी आशा - नवाब मलिक
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 6 नोव्हेंबर) - महाविकास आघाडी सरकारच्यावतीने अखेर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. आम्ही सर्व बाबींची पूर्तता करून यादी दिलेली आहे त्यामुळे राज्यपाल त्यावर शिक्कामोर्तब करतील अशी आशा आहे असे मंत्री नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.
कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करून 12 नावांची यादी मुख्यमंत्र्याच्या शिफारस पत्रासह राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली आहे. आणि आम्हाला आशा आहे की लवकरच राज्यपाल यावर निर्णय घेतील असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले, त्यावेळी पत्रकारांनी यादीमध्ये कोणाच्या नावांचा समावेश आहे, याबद्दल मलिक यांना विचारले असता, आमदारांची नियुक्ती करून नावांची घोषणा राज्यपाल करतील, ही त्यांची जबाबदारी आहे. मंत्रिमंडळाचे काम आहे, चर्चा करून मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीसह यादी समोर ठेवणे, या सार्या प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेल्या आहेत, आता राज्यपाल हे त्याला मंजुरी देऊन, नोटिफिकेशन काढतील. त्यांच्या अधिकाराचं हणन आम्ही करू इच्छित नाही असे नवाब मलिक यांनी सांगितले.
No comments