Breaking News

प्रदुषण रोखण्यासाठी दिल्लीतील मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स बंद होणार

Manufacturing units in Delhi will be shut down to prevent pollution
        गंधवार्ता वृत्तसेवा - दिल्लीमध्ये आता कोणत्याही नवीन इंडस्ट्रियल एरियामध्ये मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स लावता येणार नाहीत. तेथे फक्त हायटेक इंडस्ट्री आणि सर्व्हिस इंडस्ट्री निर्माण होतील, जुन्या मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्सला या दोन्ही सेक्टरमध्ये बदलण्याची संधी देण्यात आली  आहे. सरकारकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली असून या निर्णयाबाबत स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

        मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, दिल्लीतील इंडस्ट्रियल एरियात नवीन मॅन्यूफॅक्चरिंग युनिटला यापुढे परवानगी मिळणार नाही. फक्त सर्व्हिस सेक्टर आणि हाय-टेक इंडस्ट्रीजला युनिट लावण्याची परवानगी असेल. तसेच, जुन्या इंडस्ट्रीयल एरियात जे मॅन्यूफॅक्चरिंग युनिट्स आहेत, त्यांना चालू युनिट बंद करुन नवीन सर्विस सेक्टर किंवा हायटेक इंडस्ट्री सुरू करण्याची संधी दिली जाईल. 

           या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगला परवानगी होती ज्यामुळे प्रदूषण वाढत होते.  आता केवळ हाय टेक आणि सर्व्हिस उद्योगास परवानगी असेल त्यामुळे इंडस्ट्रियल क्षेत्रे व्यवस्थित, स्वच्छ आणि हिरवी होतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.
        हायटेक इंडस्ट्री व सर्व्हिस इंडस्ट्रीज अगोदर ऑफिस कॅटेगिरी मध्ये होते आणि ते फक्त कमर्सिअल एरियात सुरू कराव्या लागत असल्यामुळे त्यांना दिल्लीच्या इंडस्ट्रियल एरियात  महाग जमीन मिळायच्या, त्यामुळे हे सर्वजण  गुडगाव, नोएडा किंवा फरीदाबादमध्ये जायचे.  आता या कंपन्यांना दिल्लीच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये स्वस्त दरात जमिनी दिल्या जातील असे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे.

No comments