Breaking News

भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाडी, मोर्चाच्या तालुका अध्यक्षांची बैठक संपन्न

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पक्षाची बैठक नगरसेवक व गटनेते अशोकराव जाधव  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  बैठकीत सर्व आघाडी, सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी यांना त्यांच्या कार्यकारणी निश्चित करून नियुक्ती करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या तसेच आगामी ग्रामपंचायतीच्या, व पदवीधर ,शिक्षक  निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.

        यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे  यांनी मार्गदर्शन करून सर्व सेलच्या अध्यक्षांना दिनांक 8 तारखेपर्यंत प्रत्येकाने आपली कार्यकारणी ची यादी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर देऊन निश्चित करायची आहे. तसेच दिनांक 10  तारखेला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व सर्व आघाडी मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत, सर्व नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा व  सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

        बैठकीत आगामी ग्रामपंचायतीच्या, व पदवीधर ,शिक्षक  निवडणुकीच्या दृष्टीने सर्वसमावेशक  चर्चा झाली. त्या दृष्टीने  कार्यकारणी तयार करून सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांना कार्यकारणी मध्ये संधी देऊन, बुथ  लेवलवर जाऊन काम करण्याचा सुचना यावेळी देण्यात आल्या. तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भविष्यातील वाटचाल चांगल्या पद्धतीने करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. 

        यावेळी युवा मोर्चाचे राज्य संपर्कप्रमुख सुशांत निंबाळकर, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, युवा मोर्चाचे फलटण तालुका अध्यक्ष नानासो इवरे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय पवार, भटक्या आणि विमुक्त जाती जमाती चे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ उषा राऊत, डॉक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डॉ. प्रविण आगवणे, शहराध्यक्ष डॉक्टर गुळवे, किसान मोर्चाचे शहराध्यक्ष नितीन वाघ, शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रा. सतीश जंगम, अनुसूचित जाती जमातीचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन अहिवळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष राजेश शिंदे, अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष रियाज इनामदार, शहराध्यक्ष बबलू मोमीन , भाजपा तालुका उपाध्यक्ष किरण राऊत, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments