नग्न धावल्या मुळे मिलिंद सोमन वर गुन्हा दाखल
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 7 नोव्हेंबर) - वाढदिवसाच्या दिवशी गोव्यातील बीच वर नग्न होऊन धावणे व नग्न फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणे याबाबत गोवा येथे मिलिंद सोमन यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली. मिलिंद सोमन यांच्यावर इंडियन पिनल कोड व सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 4 नोव्हेंबर रोजी मिलिंद सोमन यांचा 55 वा वाढदिवस होता, त्या दिवशी मिलिंद सोमन यांनी गोवा येथे बीच वर नग्न धावून, त्याचे फोटो काढून, ते फोटो ट्विटरवर शेअर केले होते. या प्रकरणात गोव्यातील पोलिस स्टेशनमध्ये, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचा आरोप मिलिंद सोमन वर करण्यात आला आहे. हा फोटो त्याची पत्नी अंकिता कुंवर हिने क्लिक केला होता.
गोव्यातील स्थानिक राजकीय पक्ष गोवा सुरक्षा मंचने वास्को पोलिस स्टेशनमध्ये अभिनेता आणि मॉडेल मिलिंदच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये मिलिंदने अपलोड केलेल्या फोटोंमुळे गोव्याची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो अपलोड झाल्यानंतर अनेकांनी मिलिंद सोमन यांना ट्रोल करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याच्या या कृतीला विरोध दर्शवला आहे तर काहींनी आश्चर्य करत लग्न धावण्या मागे काही सायंटिफिक रिजन आहे का? अशी अशी विचारणा केली आहे.
No comments