Breaking News

ना. धनंजय मुंडे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल

Minister Dhananjay Munde admitted to Lilavati Hospital
        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 10 नोव्हेंबर - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबई येथिल लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. पोटदुखी मुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होत असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे ना. धंनजय मुंडे  यांनी ट्विटरच्या माध्यमातून  सांगितले आहे. 

        सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,  'तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.'
        सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती.

No comments