Breaking News

युवकाकडून वयस्कर महिलेचा खून; बलात्काराचा संशय

 
Murder of an elderly woman by a youth at Phaltan ST stand

            फलटण गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 2 नोव्हेंबर) - मलठण  फलटण येथील  युवकाने फलटण एस टी स्टँड येथे जुन्या बारामती प्लॅटफॉर्मवर एका वयस्कर महलेचा फरशीवर आपटून किंवा कठीण हत्याराने खून केला असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी मयत महिला व सदरचा युवकही  जुन्या बारामती प्लॅटफॉर्म वर झोपलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून डॉग स्क्वाडला पाचारण करण्यात आले होते,  सदर डॉग स्क्वाडने घटनास्थळावरील साहित्याच्या वासावरून आरोपीस ओळखले आहे. दरम्यान काल रात्री  युवकाने दारूच्या नशेत वयस्कर महिलेवर अत्याचार करून तिचा खून केला असल्याचा संशय घटनास्थळावर व्यक्त केला जात आहे.
फलटण एस. टी. स्टँड येथे तपासासाठी डॉग स्क्वाडला पाचारण केले होते
         मयत महिला ही, 2 ते 3 महिन्यापासून फलटण एस. टी. स्टँडवर  मुक्कामी होती.  मयत  महिला जागेवरून उठत न्हवती ती एकाच जागी बसून असायची, व येणाऱ्या जाणाऱ्याला आवाज देऊन बोलवायची व काही खायला मिळते का ते पहायची. प्रवाशांकडून मागून अथवा कोणी दिले तर पोटाला खायचे व जुन्या बारामती प्लॅटफॉर्म येथे बसून राहायचे असा तिचा रोजचा दिनक्रम होता.  

        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार  आज 2 नोव्हेंबर 2020 रोजी पहाटे फलटण एसटी स्टँड च्या जुना बारामती प्लॅटफॉर्म येथे एका अनोळखी महिला वय - ५० ते ५५ वर्षे ( भिकारी किंवा वेडसर असण्याची शक्यता) या महिलेचा आरोपी  अविनाश रोहिदास जाधव रा. संतोषीमातानगर मलटण, फलटण याने अज्ञात कारणास्तव,  अनोळखी 50 ते 55 वयोगटातील स्त्रीला फरशीवर तोंड आपटून अथवा कोणत्यातरी कठीण हत्याराने तिचे डोक्यावर डाव्या बाजूस मारून गंभीर जखमी करून तिचा खून केला असल्याची फिर्याद दत्तात्रय बबन सोनवलकर वय 55 वर्षे व्यवसाय सुरक्षारक्षक यांनी दिली आहे. 

        पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमाण हे करीत आहेत. घटनास्थळाला पोलीस उपअधीक्षक डॉ. देशमुख यांनी भेट दिली.
        यातील आरोपीला फलटण एस टी स्टँडवरील सुरक्षारक्षक व आजूबाजूचे रिक्षाचालक व नागरिकांनी घटनास्थळावरून मयत बाईच्या जवळ झोपलेला असताना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलिसांना त्यांनी कळविले व पोलिसांच्या ताब्यात दिले आहे .सदर इसमाने मयत महिला हिला का  मारले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत


No comments