Breaking News

शालेय शिक्षण विभागातर्फे 11 वीसाठी ऑनलाईन क्लासेस

Online classes for 11th class by the school education department
        गंधवार्ता वृत्तसेवा - राज्यातील 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कला वाणिज्य व शास्त्र शाखेचे ऑनलाईन क्लास शालेय शिक्षण विभाग आज दिनांक 2 नोव्हेंबर पासून सुरू करत असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
        इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 29 नोव्हेंबर पासून शालेय शिक्षण विभागाचे ऑनलाईन क्लासेस सुरू होत आहेत तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh या लिंक वर क्लिक करून नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. 

        कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, सध्या शाळा, कॉलेज बंद असले तरी, शासनाने ऑनलाइन शिक्षण चालू केल्यामुळे, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून निघण्यास मदत होत आहे. राज्यातील इयत्ता 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी कला वाणिज्य व शास्त्र शाखेचे ऑनलाईन क्लास शालेय शिक्षण विभाग आजपासून सुरू करत आहे, विद्यार्थ्यांनी दिलेल्या लिंक वर त्वरित नाव नोंदणी करून याचा लाभ घ्यावा.

No comments