Breaking News

दिपावली सणानिमित्त नागरिकांसाठी आदेश जारी

Order issued by district administration for establishments and citizens on the occasion of Diwali

        सातारा दि. 4 -: दिपावली तसेच इतर सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांनी सणाच्या निमित्ताने व इतर कामाच्या निमित्ताने इतरत्र वावरताना सुद्धा कायमस्वरुपी चेहऱ्यावर मास्क वापरणे, कामानिमित्त प्रवासादरम्यान व इतर सर्व ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे याबाबतचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी जारी केले आहेत.
      बाजारपेठेमध्ये खरेदी करतेवेळी ग्राहकांनी चेहऱ्यावर मास्क घालने बंधनकारक राहील. तसेच दुकानामध्ये सोशलडिस्टंसिंगचे पालन करुन खरेदी करणे बंधनकारक राहील व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे सुद्धा बंधनकारक राहील. जिल्ह्यातील संबंधित आस्थापनांनी आपापल्या दुकानामध्ये जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घणे आवश्यक आहे. ग्राहकांना दुकानामध्ये येताना चेहऱ्यावर मास्क घालनेबाबत सूचित करण्यात यावे व आपल्या दुकानाच्या बाहेर सॅनिटायझरची सोय करण्यात यावी व येणाऱ्या प्रत्येक ग्राहक हा सॅनिटायझरचा वापर करीत आहे किंवा नाही याकडे लक्ष देण्यात यावे. वेळोवेळी आपले दुकान सॅनिटायझेशन करणेसुद्धा बंधनकारक राहील.  या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विलंब अथवा टाळाटाळ केल्यास संबंधिता विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात प्र. जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी नमुद केले आहे.

No comments