फलटणच्या भुयारी गटार योजनेची क्वालिटी कंट्रोल चाचणी करावी - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
![]() |
भुयारी गटर योजनेच्या कामाची पाहणी करताना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर समवेत अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, सुशांत निंबाळकर, अभिजित नाईक निंबाळकर, अमोल सस्ते, जाकीरभाई मणेर |
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा ) - फलटण शहरात सुरू असणाऱ्या भुयारी गटर योजनेच्या कामाची पाहणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. या योजनेची कामे ही निकृष्ट दर्जाचे झाली असून, सदर कामाची क्वालिटी कंट्रोल पथक नेमून कामाच्या गुणवत्ता व दर्जाची चाचणीचा जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत भुयारी गटार योजनेचे काम बंद ठेवावे तसेच या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांवर डांबरी पॅचवर्क करण्याची मागणी खासदार रणजितसिंह यांनी केली असता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपअभियंता संत यांनी सदर मागणीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फलटण शहरात सुरू असणाऱ्या भुयारी गटार योजने मुळे शहरातील रस्त्यांची अवस्था खराब झाली असल्याच्या कारणावरून सर्वपक्षीय धरणे आंदोलन दि. 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर दिनांक 10 नोव्हेंबर रोजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरातील रस्त्यांची व भूमिगत भुयारी गटार योजनेची पाहणी केली असता, त्यांना सदर योजनेच्या कामात काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले, त्या अनुषंगाने त्यांनी संबंधित मजीप्रा चे अधिकारी संत यांना सूचना दिल्या व उपरोक्त मागणी केली. याप्रसंगी नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता माने, लक्ष्मी इंजिनियरिंग चे महेश नाईक, फलटण नगरपालिकेचे विरोधी पक्षाचे गटनेते अशोकराव जाधव,नगरसेवक सचिन अहिवळे, अभिजित नाईक निंबाळकर, अमोल सस्ते, सुशांत निंबाळकर, नितीन जगताप, बाळासाहेब कुंभार, जाकीरभाई मणेर, रियाज इनामदार, राजाभाऊ देशमाने, वसीम मणेर, संजय गायकवाड, सागर लांभाते, निलेश चिंचकर आदीउपस्थित होते.
भुयारी गटर योजनेच्या कामाची पाहणी करीत असताना खा. रणजितसिंह यांना कामामध्ये अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. भुयारी गटर योजनेच्या कामातील चेंबर्सची कामे दर्जेदार होत नाहीत, तसेच कामासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे ह्यावेळी निदर्शनास आले. त्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना खा. रणजितसिंह यांनी काम थांबवण्याचे सूचना दिल्या. व भुयारी गटार योजनेचे काम झाल्यानंतर त्याचे पॅचवर्क डांबरीकरणाचे काम सत्वर हाती घ्यावे, सदर कामावर क्वालिटी कंट्रोल पथकाची नेमणूक करून कामाची गुणवत्ता व दर्जा यांची तपासणी व्हावी आणि जोपर्यंत क्वालिटी कंट्रोल पथकाचा अहवाल येत नाही तो पर्यंत फलटण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम बंद ठेवण्यात यावे अश्या सूचना खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
No comments