Breaking News

कृषी विधेयक रद्द करावे व इतर मागण्यांसाठी स्वाभिमानाचे फलटणला रास्तारोको

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयके रद्द करा यासह शेतकऱ्यांच्या विवीध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने, जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिसिंह नाना पाटील चौक, फलटण रास्ता रोको करण्यात आले.
 
         अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने राजू शेट्टी  व व्ही.एम.सिंग यांनी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात देशभर आंदोलनाची हाक दिली होती. देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून ‘स्वाभिमानी’च्या वतीने फलटण  येथे नाना पाटील चौक येथे काल दि. ५ नोव्हेंबर रोजी रास्तारोको करण्यात आला.
             या रास्तारोकोमध्ये शेतकरी विरोधी कृषी विधेयके सरकारने रद्द करावे,शेतकऱ्यांना किमान 25 हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, पिकविमा कंपन्यांना शेतकऱ्यांना 100% पिकविमा देण्यास सरकारने बाध्य करावे, कापसाची हमीभावांने खरेदी करण्यासाठी तात्काळ CCI चे खरेदी केंद्र चालू करावे, तसेच संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याची वस्तुनिष्ठ आणेवारी 50 पैशाच्या आत काढण्यात यावी,या मागण्या करण्यात आल्या.
   केंद्र व राज्य सरकार  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नसून जर सदर मागण्यां मान्य झाल्या नाही. तर मग शेतकऱ्यांच्या उद्रेकाला केंद्र व राज्य सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यावेळी दिला. तब्बल एक तास झालेल्या या रास्तारोको मुळे पुणे - पंढरपूर रस्तावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता.
            यावेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हा अध्यक्ष मा. धनंजय महामुलकर. फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव.  फलटण तालुका युवक अध्यक्ष मा. प्रमोद गाडे . फलटण तालुका शहराध्यक्ष  मा.सचिन खानविलकर. दादा जाधव. सुभाष जाधव.बाळासाहेब शिपकुले. विश्वनाथ यादव. मा.पप्पू सत्रे.मा. प्रल्हाद आहिवळे. मा.पंकज आटपाडकर.  यांच्यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments