Breaking News

भुयारी गटार योजना मुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करा अन्यथा धरणे आंदोलन

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहरातील रस्ते खराब झालेले आहेत,  त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. 7 दिवसाच्या आत रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर  दिनांक 9 नोव्हेंबर 2020 पासून नगर परिषदेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोक जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
        नगरसेवक अशोक जाधव यांनी मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण नगर परिषद हद्दीमध्ये स्मार्ट सिटी च्या नावाखाली भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे. शहरातील बहुसंख्य पेठेमध्ये या कामाची सुरुवात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. परंतु त्या कामामुळे चांगले रस्ते उखडले जात असून,  नागरिकांना व वाहनचालकांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. शिवाय भुयारी गटार योजनेचे काम करणारी लक्ष्मी इंजिनिअरिंग कोल्हापूर ही कंपनी रस्ता दुरुस्त करत नाही.  पुढे रस्ता उकरल्या उकरल्या मागे लगेच पॅचवर्क झाले पाहिजे, पण तसे होताना दिसत नाही. शहराच्या काही भागात तर दोन वर्षे झाली उकरूनठेवले आहेत.  त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही, पावसाळ्यात लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत.  सात दिवसाच्या आत पॅचवर्क करावे अन्यथा   दिनांक 9 नोव्हेंबर 2020 पासून नगर परिषदे समोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येईल.

No comments