Breaking News

संजय मोरे यांचे निधन

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण येथील क्रिकेटपटू संजय प्रल्हाद मोरे  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. क्रिकेटमध्ये त्यांच्या खास शैलीमुळे संजय सर्वत्र प्रसिद्ध होते.  क्रिकेटप्रेमींमध्ये जावेद या टोपण नावाने ओळख असलेल्या संजय मोरे यांच्या अचानक जाण्याने फलटण मध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

        फ ल ट ण च्या क्रिकेटमध्ये सातत्याने अग्रेसर असणारे संजय मोरे क्रिकेट समीक्षक, समालोचक म्हणूनही सुपरीचित होते. क्रिकेट खेळण्याच्या वेगळ्या शैलीमुळे आंतरराष्ट्रीय खेळाडू जावेद मियांदाद यांच्या नावावरून संजय मोरे 'जावेद' या टोपण नावाने मित्रपरिवारात परिचित होते. अतिशय सर्वसामान्य परिस्थितीतून स्वतःच्या कर्तृत्वावर विविध व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख संजय मोरे यांनी निर्माण केली होती.

त्यांच्या पाठीमागे वडील, तीन भाऊ, बहिणी, भावजय, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

No comments