Breaking News

पहा! हॅलोवीन दिनी शिल्पा शेट्टीचा घोस्टवुल्फ फेस

फिल्मीगंध
Shilpa Shetty's Ghostwolf Face on Halloween

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 31 ऑक्टोबर 2020 - दरवर्षी 31 ऑक्टोबर या दिवशी जगभरात ख्रिस्ती बांधव हॅलोवीन दिन साजरा करतात. यादिवशी भोपळ्याला भयावह वाटणाऱ्या आकृतीमध्ये कापून त्यामध्ये दिवे सोडले जातात. विविध बाया व वेशभूषा करून मोठ्या दिमाखात हा दिवस साजरा केला जातो.  सध्या सोशल मीडियावर सामान्य नागरिकांसह सेलिब्रिटी देखील हॅलोवीन दिन साजरा करून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असतात, हॅलोविन दिन साजरा करण्यास आता भारतीय देखील पुढे सरसावले आहेत. आज हॅलोवीन दिनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी ट्विटरवर हॅलोविन दिनाच्या शुभेच्छा देत, थोडेसे सौंदर्य आणि थोडा पशु  घोस्ट वुल्फ फेस असणारा व्हिडिओ  प्रसिद्ध करून हॅलोवीनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments