Breaking News

शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षा ७ नोव्हेंबरपासून

Shivaji University entrance exam from November 7
        कोल्हापूर, दि. 4 नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील एम.एस्सी. व तत्सम अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षा येत्या ७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.

        सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ अधिविभागांत तसेच संलग्नित महाविद्यालयांत शिकविल्या जाणाऱ्या एम.एस्सी. व तत्सम पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा शनिवार, दि. ७ नोव्हेंबरपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. या अनुषंगाने सविस्तर तपशील गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर http://www.unishivaji.ac.in/mscadmission/admission2020 या लिंकवर ठेवण्यात येणार आहे, असेही कुलसचिवांनी कळविले आहे. 

No comments