Breaking News

शेअर बाजारात तेजी कायम

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 6 नोव्हेंबर) - सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची तेजी आठवडय़ाच्या पाचव्या दिवशीही कायम राहत गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे आज सलग पाचव्या व आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही शेअरबाजार तेजीवर स्वार झालेला दिसला.  सेन्सेक्स 552 अंकांनी वधारला असून तो 41893 अंकावर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 143 अंकाच्या वाढीसह 12263 अंकावर बंद झाला.

        सध्या बाजारात आयटी सेवा क्षेत्र वगळता बँका, वित्त संस्था, ऑटो, फार्मा , एफएमसीजी या क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु आहे. रिलायन्स इंडट्रीजच्या शेअरने आज निर्दशांकाना बळ दिले आहे. रिलायन्स 3.58 टक्क्यांनी वधारला आहे. त्याशिवाय एचडीएफसी, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, टायटन, बजाज ऑटो, इन्फोसिस या शेअरमध्ये वाढ झाली आहे. 

टॉप गेनर्स शेअर (Top Gainers Share)
आज शेअर बाजारामध्ये खालील प्रमुख शेअर मध्ये वाढ झाली.
इंडियाबुल्स वेंचर 11.1 टक्के
इंडिया बुल्स फायनान्स 5.32 टक्के
रिलायन्स 3.58 टक्के
बजाज फिनसर्व 3.48 टक्के
इंडसइंड बँक 3.6
एचडीएफसी 3.06 टक्के
कोटक बँक 2.30 टक्के
महिंद्रा अँड महिंद्रा 1.64 टक्के
एबीबी इंडिया 4.89 टक्के
गोदरेज प्रॉपर्टी 4.30 टक्के

टॉप लूजर्स शेअर (Top Losers Share)
काही महत्वाच्या शेअर्स चे भाव आज घसरले 
मारुती 2.72 टक्के
 गेल 1.89 टक्के
 भारती एअरटेल 1.54 टक्के
 एशियन पेंट 1.49 टक्के
 ग्रसिम 1.29 टक्के
 अंबुजा सिमेंट 3.03

No comments