Breaking News

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान

        सातारा दि. 10  -:  पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या  निवडणुकीचे मतदान मंगळवार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार आहे. या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवशी संबंधितांना विशेष नैमित्तीक रजा देण्यात यावी, असे महाराष्ट्र राज्याचे अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी कळविले आहे.

          या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि.23 जून 2011 च्या शासन निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा मंजूर करण्यात यावी. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजे व्यतिरिक्त असणार आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करावी, असेही अवर सचिव व उप मुख्य निवडणूक अधिकारी शुभा बोरकर यांनी कळविले आहे.

No comments