Breaking News

सातारा जिल्ह्यात 105 नागरिकास दिला आज डिस्चार्ज

105 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 16 - :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 105 नागरिकास  घरी सोडण्यात आले असून 335 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

335 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, कराड 30, फलटण 7, कोरेगाव 6, वाई 7, खंडाळा 7,  रायगाव 36, पानमळेवाडी 134, महाबळेश्वर 7, तळमावले 20, तरडगाव 3 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 95 असे एकूण 335 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

एकूण नमुने -269840

एकूण बाधित -53744  

घरी सोडण्यात आलेले -50611  

मृत्यू -1779

उपचारार्थ रुग्ण-1354

No comments