Breaking News

सातारा जिल्ह्यात 176 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

176 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 9  -:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 176 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 386 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 3, कराड येथील 9, फलटण येथील 10, कोरेगाव येथील 4, वाई येथील 21, खंडाळा 7, रायगाव येथील 57, पानमळेवाडी येथील 106, महाबळेश्वर येथील 19, पाटण 14, खावली येथील 15, तळमावले 6, म्हसवड येथील 25, तरडगांव येथील 9, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 54 असे एकूण 386 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

*घेतलेले एकूण नमुने – 260687

*एकूण बाधित 53083

*घरी सोडण्यात आलेले -50089

*मृत्यू -- 1753

*उपचारार्थ रुग्ण -- 1241

No comments