Breaking News

सातारा जिल्ह्यात 230 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

230 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 7 :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 230 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 379 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

379 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, कराड येथील 20, फलटण येथील 14, कोरेगाव येथील 7, वाई येथील 13, खंडाळा येथील 12, रायगाव येथील 60, पानमळेवाडी येथील 42, मायणी येथील 14, महाबळेश्वर येथील 35, दहिवडी येथील 15, खावली येथील 21,  तळमावले येथील 5, म्हसवड येथील 18, तरडगांव येथील 13, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 53 असे एकूण 379 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

एकूण बाधितांमध्ये मुळ सातारा जिल्ह्यातील 823 बाधितांचा समावेश

          महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मुळ सातारा जिल्ह्यातील परंतु इतर जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेले कोविड बाधित रुग्ण सातारा जिल्ह्यात समाविष्ठ करावयाचे असल्याने आज पर्यंतचे   एकूण 823 कोविड बाधित रुग्ण समाविष्ठ केल्याने आतापर्यंत एकूण 52,886 कोविड बाधित ऑनलाईन पोर्टल (http://cvanalytics.icmr.org.in) वर उपलब्ध आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*घेतलेले एकूण नमुने – 257961

*एकूण बाधित -- 52886

*घरी सोडण्यात आलेले -49809

*मृत्यू -- 1744

*उपचारार्थ रुग्ण -- 1333

No comments