31 डिसेंबरला महाबळेश्वर पाचगणीतील सर्व कार्यक्रमांना रात्री 10 नंतर मनाई
सातारा - :31 डिसेंबर साजरा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी पर्यटन स्थळावर पर्यटक लोक येतात. कोविडच्या अनुषंगाने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निर्बंध घालण्यासाठी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी 31 डिसेंबर रोजीच्या सर्व कार्यक्रमांना रात्री 10 वाजल्यानंतर चालू ठेवण्यास सक्त मनाईचे आदेश जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधिताविरुध्द दंडात्मक तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
No comments