Breaking News

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी काल ७३१ तर एकूण ९०४ उमेदवारी अर्ज दाखल

731 nominations were filed for Gram Panchayat elections yesterday and a total of 904 nominations were filed

         फलटण -: ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी काल (मंगळवार) ७४ ग्रामपंचायतींसाठी ७३१ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून (सोमवार) ३३ ग्रामपंचायतींसाठी १७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज अखेर एकूण ९०४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार समीर यादव आणि नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली आहे.

     ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी दि. २३ ते ३० डिसेंबर अखेर उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून दि. २३ व २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दि. २५, २६ व २७ डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. सोमवारी ३३ ग्रामपंचायतींसाठी १७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

    दरम्यान ऑनलाईन अर्ज दाखल करुन त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्यक दाखले, प्रतिज्ञापत्र व अन्य कागद पत्र जोडून सदर अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मुदतीत दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तथापी सर्व्हर डाऊन आणि नेट कनेक्टिव्हिटी नसल्याने ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्यात अनंत अडचणी येत असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एकच दिवस बाकी राहिल्याने निवडणूक आयोगाने ऑफलाइन अर्ज स्विकारण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

            ऑफलाइन अर्ज स्विकारण्याच्या सूचना करण्यात आल्यानंतर उमेदवारी अर्ज उपलब्ध करुन देताना प्रशासनाची मोठी धावपळ झाली. अर्ज छापून घेऊन उपलब्ध करुन द्यावे लागणार असल्याने त्यासाठी धावपळ करुन सायंकाळी छापील उमेदवारी अर्ज उपलब्ध झाले, मात्र उमेदवारांना ते उपलब्ध करुन देण्यासाठी यंत्रणा उभारणे, उमेदवारांना अर्ज उपलब्ध असल्याची माहिती देणे यासाठी प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.

        आता आवश्यक शुल्क घेऊन तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे तहसीलदार समीर यादव यांनी सांगितले.

    आज दाखल झालेल्या अर्जामध्ये गावे व त्यापुढे दाखल उमेदवारी अर्जांची संख्या खालीलप्रमाणे आहे. 

राजाळे १, धुळदेव ८, अलगुडेवाडी १३, सांगवी ९, टाकळवाडे १६, कांबळेश्वर २४, तावडी १, निरगुडी २६, विंचुर्णी २, धुमाळवाडी १२, बोडकेवाडी ९, सासकल १४, भाडळीं बु|| ५, भाडळीं खु|| ९, तिरकवाडी ३, सोनवडी बु|| ५, सोनवडी खु|| ८, शेरीचीवाडी हिं. ११, बिबी ४, कोऱ्हाळे ८, घाडगेवाडी १२, कापशी १३, वाघोशी ४, कापडगाव १४, कोरेगाव ९, आरडगाव २, रावडी खु|| २, रावडी बु|| २०, भिलकटी ११, पिंपळवाडी २१, तडवळे २, डोंबाळवाडी ५, खराडेवाडी ५, काळज २३, होळ ७, मुरुम २, खामगाव ७, फडतरवाडी ३, कोळकी १८, जाधववाडी फ १४, झिरपवाडी ७, निंभोरे १९, ढवळेवाडी निं ३, काशीदवादी ७, वडजल १२, सस्तेवाडी १०, खुंटे १५, शिंदेवाडी १६, ठाकुरकी ८, फरांदवाडी ८, नांदल ९, मुळीकवाडी १६, घाडगेमळा ३, वाखरी ३०, ढवळ १५, मलवडी ७, पिराचीवाडी ४, शेरीचीवाडी ढ १५, सरडे ७, साठे ३, शिंदेनगर ९, पवरवाडी १२, हनुमंतवाडी १०, गुणवरे ३, जाधववाडी ता ६, मुंजवडी १२, निंबळक १९, राजुरी २१, आंदरुड १७, कुरवली बु|| ११, नाईकबोमवाडी ४, मिरढे ११.

No comments