Breaking News

पोटावर केलेल्या मारहाणीमुळे झाला गर्भपात : विवाहितेच्या छळ प्रकरणी 9 जणांवर गुन्हा

Abortion of a married woman due to beating in the abdomen : Crime against 9 persons in marital harassment case

        फलटण दि. 6 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - शेतीच्या भांडवलासाठी व गायीच्या गोटयाचे काम करण्यासाठी तसेच नोकरीसाठी माहेरहुन पाच लाख आणत नाही या कारणावरुन पती व सासरच्या मंडळींनी विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून हाताने व लाथाबुक्क्यानी मारहाण, शिवीगाळ दमदाटी केली तसेच पतीने विवाहितेच्या पोटावर केलेल्या मारहाणीमुळे विवाहितेचा 5 महिन्याचा गर्भपात झाल्या प्रकरणी पतीसह 9 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील पती व सासरे यांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने  आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार,  १) पती गणपत हणमंत बिचुकले वय २७ वर्षे २ ) सासरा हणमंत आनंदराव बिचुकले वय ५८ वर्षे ३) सासु सौ.रंजना हणमंत बिचुकले अ.नं. १ ते ३ रा.उपळवे ता.फलटण,४) ननंद अनिता अशोक चोरमले ५) नंदावा अशोक ऊर्फ तात्या विलास चोरमले अ.नं. ४ व ५ रा.सस्तेवाडी ता.फलटण ६) ननंद सोनाली संतोष काळे ७) नंदावा संतोष गुलाब काळे अ.नं. ६ व ७ रा.काळे वस्ती वडुज ता.खटाव ८) ननंद शितल आप्पा तांबे ९) नंदावा आप्पा सिताराम तांबे अ.नं. ८ व ९ रा.तांबेवस्ती पिंपळवाडी साखरवाडी ता.फलटण यांनी दिनांक ०१/११/२०१७ ते दि.२३/०९/२०२० पर्यंत आपापसात संगनमत करून, वेळोवेळी मौजे उपळवे ता. फलटण येथे, मनीषा गणपत बीचुकले या विवाहितेस शेतीच्या भांडवलासाठी व गायीच्या गोटयाचे काम करण्यासाठी तसेच नोकरीसाठी माहेरहुन पाच लाख आणत नाही तसेच इतर शुल्लक कारणावरुन वेळोवळी विवाहितेचा शाररीक व मानसिक छळ व जाचहाट करुन हाताने लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली. यातील आरोपी नं. १ पती गणपत हणमंत बिचुकले यांनी दिनांक १८/०१/२०२० रोजी विवाहितेस अपमानित करुन मारहाण केली तसेच दिनांक ०१/०७/२०२० रोजी सकाळी ८.३० वा.चे सुमारास विवाहितेचा पती गणपत बिचुकले यांनी वरील कारणावरुन व जेवनाचा डबा बेळेवर तयार न झालेच्या कारणावरुन, विवाहिता ही ५ महिन्याची गरोदर असताना देखील विवाहितेच्या पोटावर लाथाबुक्क्याने जबर मारहाण केल्याने विवाहितेचा गर्भपात झाला असल्याची फिर्याद मनीषा गणपत बीचुकले यांनी दिली आहे.

        दरम्यान गुन्हयाच्या तपासात वैदयकिय अधिकारी यांच्याकडे केलेल्या तपासाअंती व विवाहितेने दिलेल्या पुरवणी जबाबावरुन  विवाहितेच्या पोटावर तिचा पती याने मारहाण केल्याने गर्भपात झाल्याचे निष्पन्न होत असल्याने सदरच्या गुन्हयात वाढीव कलम लावन्यात आले. यातील आरोपी नं. २ सासरे याने यातील पिडीतेस पोटात दुखत असताना डॉक्टरकडे नेले होते, गर्भपात झाल्यावर गर्भ व वार डॉक्टर यांनी आरोपी नं. २ यांच्याकडे दिली होती, त्यांनी त्याची विल्हेवाट लावलेली आहे. आरोपी यांना मा.न्यायालयात भेटवले असता मा.न्यायालयाने त्यांची ४ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे असल्याचे पोलीस निरीक्षक एन. टी. सावंत यांनी कळविले आहे. 

No comments