तेलंगाणा मध्ये अभिनेता सोनू सूद यांचे मंदिर
गंधवार्ता वृत्तसेवा - तेलंगाणातील डब्बा टेंडा गावातील लोकांनी अभिनेता सोनू सूद यांचे मंदिर उभारले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात देश लॉक डाऊन स्थितीमध्ये असताना आणि अनलॉक होत असतानाहीअभिनेते सोनू सूद यांनी अनेक गरजवंतांना मदतीचा हात दिला आहे. लोकांनी सोनूच्या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे मंदिर उभे केले आहे.
तेलंगाणातील डब्बा टेंडा गावातील लोकांनी हे मंदिर उभारले आहे. २० डिसेंबर रोजी या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंदिरामध्ये ग्रामस्थांनी सोनू सूदचा एक पुतळा बसवला तसेच त्याची आरतीही केली. आरतीनंतर ग्रामस्थांनी 'जय हो सोनू सूद' अशी घोषणाबाजीही केली.
लॉकडाऊनमध्ये सोनू सूद हे आमच्या गावासाठी देव ठरले आहेत. तो देवच आहे, अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडाल रेड्डी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर दुब्बा तांडा गावच्या स्थानिकांनी अभिनेता सोनूसूद यांच्या परोपकारी कार्याला मान्यता देण्यासाठी एक मंदिर बांधले असल्याचे काहीजण सांगतात.
तसेच सोनू सूदचा पुतळा साकारणारे कलाकार मधुसूदन पाल म्हणाले, आपल्या मदतशीर स्वभावाने या अभिनेत्याचे लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. त्यामुळे मी देखील त्यांना भेट म्हणून सोनूची छोटीशी मूर्ती तयार केली. साथीच्या रोगाच्या वेळी त्याने बर्याच लोकांना मदत केली. आम्ही त्याचे मंदिर बांधले ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे अश्या प्रतिक्रिया नागरिकांच्यातून येत आहेत.
No comments