Breaking News

अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने वृद्ध ठार

        फलटण दि. 6 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - मौजे अलगुडे वाडी हद्दीत फलटण बारामती रोडवर,  6 डिसेंबर रोजी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास  हेरिटेज दूध डेअरी, सांगावी ता. फलटण येथे नोकरीसाठी, दुचाकीवर चाललेल्या वृद्धास अज्ञात वाहनाने जोराने ठोकर दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी रामचंद्र गोरे वय 62 वर्ष रा. सुरवडी तालुका फलटण जिल्हा सातारा हे सांगवी येथील हेरिटेज दुध डेअरी येथे वाहनचालक म्हणून कामास आहेत. ते पहाटे सांगवी येथे कुटी या दुचाकी वरून कामास जात असताना, आज 6 डिसेंबर रोजी पहाटे 5:45 वाजण्याच्या सुमारास  फलटण बारामती रोडवर, बंद असलेल्या लोखंडी कारखान्याजवळ, कोणत्यातरी अज्ञात वाहनाची ठोकर लागून अपघात होऊन, ते अपघातामध्ये  मयत झाले असल्याची फिर्याद सचिन शिवाजी गोरे रा. सुरवडी यांनी दिली आहे आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत.

        मयत इसम गोरे हे हेरीटेज डेअरीमध्ये चालक म्हणून काम करतात. ते सकाळी ६.०० वा. कामावर निघाले होते. सकाळी माॅंर्ऩीग वाॅक करणार्‍या नागरीकांना ते रस्त्यावर पडलेले दिसल्यानंतर पोलीसांना कळविले. त्यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाल्याने ते जाग्यावरच मयत झाले आहेत.  सदर रोडवरील CCTV फुटेज तपासत आहोत.  सदर अपघाताबाबत कोणाला माहिती असल्यास अथवा  मिळाल्यास फलटण शहर पोलीसांशी संपर्क साधण्याबाबत पोलीसांकडून आवाहान करण्यात आले आहे

No comments