Breaking News

विद्यार्थ्यांच्या योजनांसाठीचे अर्ज महाविद्यालयांनी अर्ज भरुन घ्यावेत - सहायक आयुक्त, समाजकल्याण



        सातारा - : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यावतीने समाज कल्याण कार्यालयामार्फत अनु. जाती, विजाभज, इमाव, विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व विद्यावेतन या योजनांचा लाभ  https://mahadbtmahait.gov.in या प्रणालीवरुन ऑनलाईन राबविण्यात येत आहेत.

        यानुसार महाविद्यालयातील या योजनांचे नविन/नुतनीकरणाचे अर्ज Mahadbt या प्रणालीवर भरण्याची सुविधा 3 डिसेंबर 2020 पासुन सुरु होत आहे. सातारा जिल्हयातील कनिष्ठ, वरिष्ठ, व्यावसाईक व तांत्रिक या सर्व महाविद्यालयांना पात्र विद्यार्थ्यांचे या योजनांचे नवीन  तसेच नुतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांकडुन तात्काळ भरुन घ्यावेत. या लाभापासुन विद्यार्थी वंचित राहणार नाही याची सर्व विद्यार्थी महाविद्यालयांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सातारचे सहायक आयुक्त, समाजकल्याण  नितीन उबाळे यांनी केले आहे.


No comments