Breaking News

डीपी फोडून तांबे चोरी करणारी टोळी जेरबंद; 14 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Copper theft gang arrested; 14 lakh 55 thousand rupees confiscated

        सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातार तालुका व कोरेगाव तालुक्यातील एसएसईबीचे  डी . पी . फोडून आतील तांबे चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना यश आले आहे. टोळीकडून डी . पी .  चोरीचे २० गुन्हे उघड करून १४ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला आहे.

        सातारा जिल्ह्यातील सातारा व कोरेगाव तालुक्यातील एमेसिबी च्या डीपी फोडून, त्यातील तांबे चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरीवर्गात  चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्या अनुषंगाने अजयकुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा व धीरज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री किशोर धुमाळ यांना डीपी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते.  त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांचे अधिपत्याखाली विशेष पथकाची नेमणूक केली होती.

        दि. 9 डिसेंबर 2020 रोजी रात्री 8 ते दि.  10 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान, अंबावडे तालुका कोरेगाव गावच्या हद्दीतील कॅनॉल जवळील डीपी तोडून - फोडून त्यामधील  70 हजार रुपये किमतीची,  70 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या बाबत कोरेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

        सदर गुन्ह्यातील आरोपींचे बाबत विश्वसनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली असता, सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने,  सातारा रोड परिसरात सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने,  त्यांना 11 डिसेंबर 2020 रोजी रात्री अटक करून, त्यांना न्यायालयापुढे हजर करून अधिक तपास साठी न्यायालयाकडून पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आले. पोलिस कस्टडी रिमांड दरम्यान त्यातील आरोपीना विश्वासात घेऊन, विचारपूस केली असता, त्यांनी सातारा तसेच कोरेगाव तालुक्यातील एमएसईबी डीपी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. गुन्ह्यातील आरोपी कडून 13 लाख रुपये किमतीची एकूण 1300 किलो वजनाचे तांबे जप्त करण्यात आले आहे. याशिवाय आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली एक सेंट्रो कार, दोन मोटरसायकल व गुन्ह्यात  वापरण्यात आलेइ हत्यारे असा 14 लाख 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपींनी कबुली दिलेल्या गुन्ह्यांमध्ये कोरेगाव पोलीस स्टेशन चे 4 गुन्हे तर सातारा तालुका पोलिस स्टेशनचे 5 गुन्हे आहेत. या गुन्ह्यासह एकूण वीस गुन्हे उघडकीस आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

        पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचना प्रमाणे श किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार उत्तम ज्योतीराम बर्गे, पोलीस हवालदार प्रवीण शिंदे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, पोलीस नाईक शरद बेम्बले, नितीन गोगावले,साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, रवी वाघमारे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, गणेश कापरे, अमित सपकाळ, निलेश काटकर, राजू ननावरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, प्रमोद सावंत, सचिन ससाने, वैभव सावंत, केतन शिंदे, चालक संजय जाधव, गणेश कचरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला असून कारवायांमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

No comments