Breaking News

फलटण तालुक्यात 37 कोरोना पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू

Corona virus phaltan updates : 1 diad  and 37 corona positive 

        फलटण दि. 6 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 6 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 37 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात  9 व्यक्ती व ग्रामीण भागात 28 रुग्ण सापडले आहेत. तर 1 व्यक्ती मृत पावला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 9 कोरोना पॉझिटिव्ह

यामध्ये  बुधवार पेठ 5, लक्ष्मीनगर 1,  कसबापेठ 2, भडकमकरनगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 28 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये विडणी 5,  जाधववाडी 4, पिंपळवाडी-साखरवाडी 2, पिंप्रद 1, माठाचीवाडी 1, निंभोरे 2, हिंगणगाव 1,  धुळदेव 1, कोळकी 2, रावडी 1, मुरुम 1, पाडेगाव 1, सर्कल 1, कोळकी 1, बरड 1, तरडगाव 1, मिरेवाडी 1, हनुमाननगर 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

1 रुग्णाचा मृत्यू

जावळी ता. फलटण येथील 45 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments