Breaking News

फलटण तालुक्यात 18 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 18 corona positive 

        फलटण दि. 13 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 13 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 18 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 14 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 4 कोरोना पॉझिटिव्ह 

यामध्ये फलटण 1, मंगळवार पेठ 1, स्वामी विवेकानंद नगर 1, जिंती नाका 1 व्यक्तींच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या  आहेत.

 ग्रामीण भागात 14 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये साठे फाटा 1,  जाधववाडी 1, मुरुम 6, कोळकी 2, दुधेबावी 1, रहाटणी 1, तरडगाव 1, खराडेवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments