Breaking News

फलटण तालुक्यात 19 कोरोना पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

Corona virus phaltan updates : 2 diad  and 19 corona positive 

        फलटण दि. 10 डिसेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 10 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 19 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये  ग्रामीण भागात 19 रुग्ण सापडले आहेत. तर 2 व्यक्ती मृत पावल्या आहेत आज शहरात कोणीही पॉझिटिव्ह सापडले नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

 ग्रामीण भागात 19 कोरोना पॉझिटिव्ह 

यामध्ये कोळकी 5, साखरवाडी 2, वाखरी 2, डोंबाळवाडी 1, होळ 1, राजाळे 1, आसू 1, कांबळेश्वर 1, चौधरवाडी 1, वडजल 1, निंबळक 1, विडणी 1,जाधववाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

तालुक्यात 2 रुग्णाचा मृत्यू

शेरे शिंदेवाडी, ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, पिंपरद ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments