Breaking News

दिलासा! फलटण तालुक्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 9 corona positive 

        फलटण दि. 16 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 16 डिसेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 9 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यानंतर आज प्रथमच तालुक्यातील कोविड बधितांचा आकडा एक अंकी आला आहे.  यामध्ये शहरात 1 व्यक्ती तर ग्रामीण भागात 8 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात मलटण  येथे 1 व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 ग्रामीण भागात 8 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये पवारवाडी 1,  उपळवे 1, ताथवडा 2, वाखरी 1, वाठार निंबाळकर 1,  होळ 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

No comments