Breaking News

सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय

        सातारा - जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालयामध्ये भोजन तसेच खाद्यपदार्थ पुरवठा करणाऱ्या विविध केटरर्सच्या वतीने सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशनची स्थापना करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.

         सातारा येथील गडकर आळीतील हरी ओम केटरर्स च्या प्रांगणात नुकत्याच संपन्न झालेल्या विविध केटरर्स च्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी सातारा जिल्हा केटरर्स असोसिएशनची स्थापना करून संघटनेचे रजिस्ट्रेशन करणे, संघटनेचे महत्त्व पटवून देणे तसेच सातारा जिल्ह्यातील विविध केटरर्स बंधू-भगिनींना आपल्या अडचणी निवारणासाठी संघटनेच्या माध्यमातून सहकार्य करणे . या संघटनेच्या सदस्यांना  भरत वैष्णव सुखदेव, स्नेहदिप केटरर्स चे संजय देशपांडे मार्गदर्शन करून  आवाहन केले. 

  यावेळी सातारा शहर, रहिमतपूर ,कोरेगाव, मेढा, वाई येथील विविध नामांकित केटरर्स बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         प्रारंभी संजय देशपांडे यांनी या संघटनेच्या रजिस्ट्रेशन बाबत उपस्थितांना माहिती देऊन जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये असलेल्या केटरर्सना एकाच छताखाली आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्‍यक असून त्यांना येणाऱ्या अडचणी, त्रास यातून सुटका करण्यासाठी या व्यवसायासाठी एकत्र येणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले .

        यावेळी भरत वैष्णव यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करून सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच संघटना उभारणीसाठी आपण सर्वांनी एकदिलाने एकत्र येऊन या असोसिएशन साठी प्रयत्नशील राहू या असे आवाहन केले.

         यावेळी उपस्थित असलेल्या विविध तालुक्यातील मान्यवर केटरर्स बंधूंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार अतुल देशपांडे यांनीही बैठकीत संघटनेच्या उभारणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच प्रसारमाध्यमे याबाबत आपल्याला सदैव सहकार्य करतील अशी ग्वाही दिली .चहापानाने हे या कार्यक्रमाची सांगता झाली. 

         यावेळी नीरज गायकवाड़, अमोल शिंदे, प्रकाश सोडमिसे, कुंदन पवार, किरण कालंगे, विट्टल कुंभार(मेढा), शांताराम कुंभार(सलपाने) , हणमंत जाधव(भंनंग), दिपक शिंदे ,मीठालाल गुजर, खीमसिंह परमार, रामकिशन शर्मा, महेश माने. संजय देशपांडे. भरत वैष्णव उपस्थित होते.

No comments