कोविड -19 ची लस देण्यासंदर्भातील नियोजनाचा कोविड टास्क फोर्सचे मुख्य सल्लगार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला आढावा
सातारा -: कोविड-19 ची लस उपलब्ध होणार असून ही लस पहिल्यांदा डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांना देण्यात यावी. लस देणाऱ्या पथकाला लस देण्याबाबत परिपूर्ण असे प्रशिक्षण देण्यात यावेत,अशा सूचना डॉ. दिपक म्हैसेकर, मुख्य सल्लागार कोविड-19 टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोविड-19 लसीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ. म्हैसेकर बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, कोविड-19 टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये, यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोल्ड स्टोरेचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात एकूण 96 कोल्ड स्टोरेजची साखळी असून 1 लिटर मध्ये 210 डोसेस असतात, त्याप्रमाणे विचार केला तर ही संख्या पुरेसी आहे. लस देण्याच्या मोहिमेत जास्तीत जास्त खासगी डॉक्टर व त्यांच्या संघटनांचाही समावेश करुन घ्यावा. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबतही गरज असल्याचे लोकांपर्यंत पोहचवा. तसेच बायोमेडीक वेस्ट विल्हेवाट लावण्या विषयी संबंधितांना प्रशिक्षण द्या, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी बैठकीत शेवटी दिल्या.
283068 नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून याचे प्रमाण 94.74 टक्के आहे. रॅट टेस्टींगचे प्रमाण 55.69 टक्के, आरटीपीसीआर टेस्टींगचे प्रमाण 44.23 टक्के आहे. ब्रिटन वरुन 41 नागरिक आले आहेत त्यांचे टेस्टींग केले असून हे सर्व निगेटिव्ह असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे या बैठकीत दिली.
No comments