Breaking News

पहिल्या टप्यात कोविड लस डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांना देण्याबाबत नियोजन करण्याच्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना

District Collector Shekhar Singh's instructions for planning to give Covid vaccine to doctors and health workers in the first phase

        सातारा दि.15 -: पहिल्या टप्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना  कोविड लस देण्याबाबत शासनाने आरखडा मागितला असून यात शासकीय, खासगी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी  यांना  लस देण्याबाबतचे नियोजन तात्काळ करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या.

        जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोविड लसीबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

        जिल्ह्यात 96 फ्रीज (आयएलआर)  त्यांची क्षमता 1 हजार 970 लिटर आहे तर डीप फ्रीजची क्षमता 3 हजार लिटर पेक्षा जास्त आहे. लस ठेवण्यासाठी लागणाऱ्या स्टोरेज संदर्भातील नियोजन करण्यासही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.खासगी डॉक्टर यांनी स्वत: साठी आपल्याकडे कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना कोविड लस देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या   लिंकवरील

https://docs.google.com/spreadsheets/d/1IRGcKEJzPwtq4MbeY6WAF-YjBq31HYq46tHNVeB22pQ/edit?usp=sharing स्प्रेड शिटमध्ये माहिती भरावी, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत केले. कळविले आहे.

No comments