Breaking News

फलटण तालुक्यातील 80 ग्रामपंचतींच्या निवडणूका होणार

Elections will be held for 80 Gram Panchayats in Phaltan taluka

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 12 डिसेंबर - ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सातारा जिल्ह्यातील ८७९ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामध्ये  फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.  प्रभाग रचना व प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, अंतिम मतदार यादी 14 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. निवडणुकांसाठी दि. १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असुन १८ जानेवारी रोजी होणार मतमोजणी होईल. 

        फलटण तालुक्यामध्ये जाधववाडी(फ), कोळकी, फरांदवाडी, ठाकुरकी, वडजल, निंभोरे, धुळदेव, सस्तेवाडी, झिरपवाडी, आलगुडेवाडी, ढवळेवाडी (निं), मुंजवडी, निंबळक, जावली, तिरकवाडी, राजुरी, आंदरुड, जिंती, घाडगेमळा, आळजापूर, शेरेचीवाडी(हिं), वाखरी, हिंगणगाव, वाघोशी, घाडगेवाडी, परहर बु,  शिंदेनगर, पवारवाडी, सरडे,  सासकल, बोडकेवाडी, निरगुडी, तावडी,  राजाळे, कांबळेश्वर, कापडगाव, रावडी खु,  साठे, बिबी, कोऱ्हाळे, वडगाव, मलवडी,   काशीदवाडी,  खुंटे, शिंदेवाडी, भिलकटी, हणमंतवाडी, गुणवरे, कुरवली बु, नाइकबोमवाडी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, भाडळी बु, भाडळी खु, ढवळ, धुमाळवाडी, सोनगाव, पिंपळवाडी, सोनवडी बु, सोनवडी खु, कोरेगाव, आरडगाव, तांबवे, रावडी बु, तडवळे, डोंबाळवाडी, खराडेवाडी, काळज, होळ, मुरुम, खामगाव, नांदल, मुळीकवाडी, कापशी, विंचूर्णी, सांगवी, टाकळवाडे या गावांचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रम-

> 15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

> 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

> 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी

> 4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

> 15 जानेवारी मतदान

> 18 जानेवारी मतमोजणी

No comments