Breaking News

औषध घेऊन गेलेल्या वडिलांना मुलीच्या सासरच्या माणसांनी केली मारहाण

        फलटण  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  विवाहित मुलीच्या मुलीस भाजल्यामुळे तिचे आजोबा म्हणजे विवाहितेचे वडील औषध घेऊन मुलीच्या सासरी तावडी येथे गेले असता मुलीच्या सासरा, सासू व दीर यांनी संगणमत करून विवाहितेच्या वडिलांना काठीने मारहाण केली आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशन कडून समजलेल्या माहितीनुसार, चांगदेव सोपान बनकर वय 50 वर्षे राहणार ढवळ ता. फलटण जि. सातारा हे, तावडी येथे राहणाऱ्या विवाहित मुलीच्या मुलीस (नातीस) भाजल्यामुळे गावठी औषध घेऊन, दिनांक 4 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 7 वाजता तावडी येथे मुलीच्या घरी गेले असता, मुलीचे 1 सासरे हनुमंत गोविंद घनवट  2 सासू संगीता हनुमंत घनवट  3  दीर रोहिदास हनुमंत घनवट सर्व राहणार तावडी ता. फलटण जि. सातारा यांनी संगनमत करून, तू या ठिकाणी कशासाठी येतोस तू आल्यानंतर आमच्या घरात भांडणे लागतात असे म्हणून  चांगदेव बनकर यांना  काठीने  मारहाण केली असल्याची फिर्याद चांगदेव सोपान बनकर यांनी दिली आहे. अधिक तपास एएसआय भिसे करीत आहेत.



No comments